विशेष वार्ता! विशेष वार्ता!!
संत कबीर यांना कारणे दाखवा नोटीस!
-कविता कृष्णपल्लवी
------------------------------------------------
आता-आत्ताच सत्ताधारी वर्तुळातील विश्वसनीय सूत्रांकडून
ही वार्ता समजली आहे की,
संत कबीर यांच्याविरूद्ध केंद्रीय गृह मंत्रालयाकडून तसेच लखनौ येथील उ.प्र.मुख्यमंत्री कार्यालयातून दोन
'कारणे दाखवा' नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत!
दोन्ही नोटीसा संत कबीर यांच्या एकाच दोह्याबद्दल आहेत.
लखनौमधून बजावण्यात आलेल्या नोटिसीत संत कबीर यांच्याकडून या गोष्टीचा खुलासा मागविण्यात आला आहे की त्यांनी आपल्या एका दोह्यातील पहिल्या चरणातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अवमान केला आहे,त्यामुळे त्यांच्याविरूद्ध उ.प्र.च्या मुख्यमंत्र्यांची मानहानी केल्याचा,अराजकता पसरविल्याचा आणि राजद्रोहाचा आरोप का दाखल केला जाऊ नये?
ती वादग्रस्त ओळ आहे --
'मन न रंगाए,रंगाए जोगी कपरा!'
राज्याच्या मुख्य सचिवाचे म्हणणे आहे की हा प्राथमिकदृष्ट्या योगी आदित्यनाथ यांच्या अवमानाचा आणि जनतेमध्ये त्यांच्याविषयी गैरविश्वास निर्माण करून अराजकता पसरविण्याचा प्रकार वाटत आहे!
कारण यात माननीय योगी यांना थेटपणे ढोंगी म्हणण्यात आले आहे! मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधून अशी माहिती मिळाली आहे की कारणे दाखवा नोटिसीची एक एक प्रत कबीरचौरा,वाराणसी आणि मगहरच्या पत्यावर एक आठवड्यापूर्वीच पाठविण्यात आली होती.जर दहा दिवसांच्या आत संत कबीर यांचे उत्तर मिळत नसेल तर त्यांच्यासाठी 'लुकआऊट' नोटीसदेखील काढली जाईल आणि त्यांना शोधून ताब्यात घेण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या एस.एस.एफ.ची एक-एक बटालियन वाराणसी आणि मगहर येथे पाठविली जाईल!
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या नोटिसीत त्याच दोह्यातील दुसर्या चरणाविषयी कबिरांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.
ती ओळ आहेः
'दढिया बढाय जोगी बन गइले बकरा'
नोटिसीत कबीरांना विचारण्यात आले आहे की ही ओळ लिहून त्यांनी माननीय प्रधानमंत्री यांच्या वाढत चाललेल्या दाढीवर भाष्य केले आले आहे आणि बकरा संबोधून त्यांचा उपमर्दही करण्यात आल्याचे का मानले जाऊ नये?
आता केंद्र आणि उ.प्र.राज्य --
अशा दोन्ही सरकारांना संत कबीर
यांच्या उत्तराची प्रतिक्षा आहे,
परंतू अजूनतरी त्यांचा काहीच ठावठिकाणा
लागलेला नाहीए.
बघूया काय होतंय ते!
--------------------------------------------
मूळ हिंदी विडंबन
कविता कृष्ण पल्लवी
kavita krishanpallavi
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
No comments:
Post a Comment