Wednesday, May 12, 2021

कविताओं का मराठी अनुवाद! (भरत यादव)


 


Bharat Yadav  द्वारा नागवा राजा! कविता का मराठी अनुवाद  
शुक्रिया साथी!
*
नागवा राजा!

/ कविता कृष्णपल्लवी

🍁

राजाला जो कुणी नागवा म्हणेल
तो मारला जाईल!
जड-वजनदार शस्त्रानीं सुसज्ज सैन्य,
गुप्तहेर आणि मंत्री तसेच अधिकारी व मारेकर्‍यांच्या टोळ्या आणि न्यायाधीशानीं वेढले गेलेला राजा
निव्वळ नागवा आहे
हे सांगणारी मुलं कारागृहांमध्ये तरुण होताहेत
असेच काही तरुणानींही म्हटले आणि
ते सुळावर चढवले जाण्याची वाट बघताहेत
चौर्‍याऐंशी वर्षाच्या त्या आजारी वृद्धाने फक्त एवढेच म्हटले होते की नागव्याला नागवे,
अत्याचार्‍याला अत्याचारी,
मारेकर्‍याला मारेकरी,
दंगेखोराला दंगेखोर म्हणणे कुठला अपराध नाहीये,
भले मग तो एक शक्तिशाली राजा का असेना!
मग राजाने दाखविली
आपल्या सत्तेची अफाट ताकद 
आणि राजद्रोही ठरवून त्या चौर्‍याऐंशी वर्षाच्या आजारी वृद्धाला बेड्या घालून काळकोठरीत कैद केले गेले
तो वृद्ध मेला 
त्या काळकोठरीच्या अंधारात आणि मग संपूर्ण देशामधील भिंतींवर अशी लक्षावधी पोस्टर्स चिकटवलेली मिळायला लागली की
राजा नागवा आहे!
मग राजाने संपूर्ण देशालाच
कारागृह बनविण्याचा आदेश दिला
राजा अडाणचोट होता
त्याला इतिहासाबद्दलची कुठलीच माहिती नव्हती!
🍁
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

🍁

मूळ हिंदी कविता

राजा को जो भी नंगा कहेगा
मारा जायेगा!
भारी-भरकम हथियारों से लदी-फदी
सेना और जासूसों और मंत्रियों और
अधिकारियों और हत्यारों के गिरोहों और
न्यायाधीशों से घिरा हुआ राजा 
अलफ़ नंगा है
यह कहने वाले बच्चे जेलों में जवान हो रहे हैं।
ऐसा कुछ जवानों ने भी कहा और वे 
सूली पर चढ़ाये जाने का 
इन्तज़ार कर रहे हैं।
चौरासी साल के उस बीमार बूढ़े ने
बस इतना ही कहा था कि नंगे को नंगा,
आततायी को आततायी, हत्यारे को
हत्यारा और दंगाई को दंगाई कहना
कोई गुनाह नहीं है, भले ही वह
एक शक्तिशाली राजा हो।
फिर राजा ने दिखाई अपनी सत्ता की
अपार शक्ति और राजद्रोही क़रार देकर
उस चौरासी साल के बीमार बूढ़े को
बेड़ियाँ पहनाकर कालकोठरी में
डाल दिया गया।
वह बूढ़ा मरा उस कालकोठरी के अँधेरे में
और फिर पूरे देश की दीवारों पर 
ऐसे लाखों पोस्टर रोज़ चिपके हुए
मिलने लगे कि 'राजा नंगा है!'
फिर राजा ने पूरे देश को ही
जेलखाना बनाने का आदेश दे दिया।
राजा अनपढ़ था!
उसे इतिहास की कोई जानकारी नहीं थी!
🍁
©कविता कृष्णपल्लवी
Kavita Krishnapallavi 

****

*****

(कामरेड भरत यादव ने 'ग़ाज़ा के एक बच्चे की कविता' का ख़ूबसूरत मराठी अनुवाद किया है। आभारी हूँ!)

*

गाझापट्टीतील एका चिमुकल्याची कविता

/ कविता कृष्णपल्लवी

🍁

बाबा! 

मी पळू शकत नाहीये

रक्ताळलेल्या मातीने बरबटलेले माझे बूट 

फारच जड झालेयत

माझे डोळे आंधळे होताहेत

आकाशातून बरसणार्‍या आगीच्या चमचमाटाने

बाबा,

माझे हे हात आता दगड दूरपर्यंत फेकू शकत नाहीत

आणि माझे पंखसुद्धा अद्याप खूप लहान आहेत

बाबा! 

गल्लीत विखुरलेल्या ढिगार्‍यांमध्ये लपंडाव खेळणारे माझे तीन भाऊ कुठे निघून गेले आहेत?

आणि ते तीन छोटे छोटे ताबूत उचलून मित्रमंडळी आणि शेजार्‍यांसोबत तुम्ही कुठे गेला होतात?

मी घाबरलो होतो बाबा,

तुम्ही पकडले गेले असाल

आणि कुठे तरी अज्ञात काळोख्या ठिकाणी कोंडून ठेवले गेला असाल म्हणून,

जसा अहमद,माजिद आणि सफी 

यांच्या वडिलांवर प्रसंग आलेला

मी भ्यालो होतो बाबा,

कारण मला तुमच्याशिवाय जगावं लागेल की काय 

असं वाटलं,

जसा मी जगतो आहे माझ्या अम्मीविना

तिच्या पदराच्या दुग्धयुक्त छायेच्या आणि 

अंगाईच्या आठवणींसोबत

मला नाही ठाऊक बाबा, 

की ते लोक का बरं जाळतायत जैतूनच्या बागा

नाही ठाऊक मला आपल्या वस्तीतला ढिगारा का हटवला नाही गेला अजून आणि नवी घरं का उभारली नाहीत अजूनही!

बाबा! 

या भल्या मोठ्या दुनियेमध्ये

खूप सारी मुलं असतील आमच्याचसारखी

आणि त्यांचेही पालक असतील

जे त्यांच्यावर नितांत प्रेम करत असतील

बाबा, 

कधी ते आमचाही विचार करत असतील का हो?

बाबा!

मी समुद्रकिनारी चाललो आहे

फुटबाॅल खेळायला.

जर मला बराच उशीर झाला

तर मला न्यायला जरूर या,

तुम्ही मला तुमच्या बाहूपाशात 

उचलून आणा आणि एका विशाल ताबूतात निजवा

म्हणजे मी त्यात मोठा होत जाईन

तुम्ही मला शांतीपर्वातले एक छानसे गाणे ऐकवा,

जैतूनच्या एका फांदीचे झाड होत असल्याचे बघा,

आणि धरणीच्या मांडीवर

मी मोठा होण्याची प्रतीक्षा करा.

🍁

मराठी अनुवाद

भरत यादव

🍁

मूळ हिंदी कविता

ग़ाज़ा के एक बच्‍चे की कविता

बाबा! मैं दौड़ नहीं पा रहा हूँ।

ख़ून सनी मिट्टी से लथपथ

मेरे जूते बहुत भारी हो गये हैं।

मेरी आँखें अंधी होती जा रही हैं

आसमान से बरसती आग की चकाचौंध से।

बाबा! मेरे हाथ अभी पत्‍थर

बहुत दूर तक नहीं फेंक पाते

और मेरे पंख भी अभी बहुत छोटे हैं।

बाबा! गलियों में बिखरे मलबे के बीच

छुपम-छुपाई खेलते

कहाँ चले गये मेरे तीनों भाई?

और वे तीन छोटे-छोटे ताबूत उठाये

दोस्‍तों और पड़ोसियों के साथ तुम कहाँ गये थे?

मैं डर गया था बाबा कि तुम्‍हें

पकड़ लिया गया होगा

और कहीं किसी गुमनाम अँधेरी जगह में

बन्‍द कर दिया गया होगा

जैसा हुआ अहमद, माजिद और सफ़ी के

अब्‍बाओं के साथ।

मैं डर गया था बाबा कि

मुझे तुम्‍हारे बिना ही जीना पड़ेगा

जैसे मैं जीता हूँ अम्‍मी के बिना

उनके दुपट्टे के दूध सने साये और लोरियों की

यादों के साथ।

मैं नहीं जानता बाबा कि वे लोग

क्‍यों जला देते हैं जैतून के बागों को,

नहीं जानता कि हमारी बस्तियों का मलबा

हटाया क्‍यों नहीं गया अबतक

और नये घर बनाये क्‍यों नहीं गये अबतक!

बाबा! इस बहुत बड़ी दुनिया में

बहुत सारे बच्‍चे होंगे हमारे ही जैसे

और उनके भी वालिदैन होंगे।

जो उन्‍हें ढेरों प्‍यार देते होंगे।

बाबा! क्‍या कभी वे हमारे बारे में भी सोचते होंगे?

बाबा! मैं समन्‍दर किनारे जा रहा हूँ

फुटबाल खेलने।

अगर मुझे बहुत देर हो जाये

तो तुम लेने ज़रूर आ जाना।

तुम मुझे गोद में उठाकर लाना

और एक बड़े से ताबूत में सुलाना

ताकि मैं उसमें बड़ा होता रहूँ।

तुम मुझे अमन-चैन के दिनों का

एक पुरसुक़ून नग्‍़मा सुनाना,

जैतून के एक पौधे को दरख्‍़त बनते

देखते रहना

और धरती की गोद में

मेरे बड़े होने का इन्‍तज़ार करना।

🍁

©कविता कृष्णपल्लवी

Kavita Krishnapallavi 

🍁🍁🍁

#अनुवादमाला

......................


(साथी भरत यादव ने ' महान नेता के कुछ किस्से' का मराठी में अनुवाद किया है। मराठीभाषी साथियों के लिए। उनका आभार!)

महान नेत्याचे काही किस्से

/ कविता कृष्णपल्लवी

-----

न्यायमुर्ती जेव्हा आपल्या चेंबरमध्ये पोहोचले तेव्हा ते हसून हसून बेजार झाले होते आणि पोट धरून खुर्चीत कोसळू पाहात होते.

शिपायाने विचारल्यावरून ते बोलले,

'बाप रे असला विनोद मी आख्या आयुष्यात कधी ऐकला नव्हता!'

शिपाई म्हणाला,

'कुठला विनोद महाराज?

न्यायाधीश म्हणाले,'तो मी ऐकवू शकत नाही.आत्ताच त्यावरून एका स्टॅंडअप काॅमेडियनला पाच वर्षांच्या सक्त मजूरीची शिक्षा ठोठाऊन येतो आहे.आपल्या महान नेत्याची अशी टर कशी काय उडवली जाऊ शकते बरं!!

------

सकाळ सकाळी एका प्रचंड धरणावर  बनलेल्या सरोवराकाठी फिरताना,महान नेते रेलिंगला झुकून उभे राहिले आणि मासे पाहू लागले.एवढ्यात तोल गेला आणि ते धपकन सरोवरात पडले आणि बुडायला लागले.

सोबत चालत असलेल्या शरीररक्षकाने विनाविलंब उडी मारून त्यांना वाचवलं.

खुश होऊन महान नेता म्हणाला,'माग,काय मागतोस!'

शरीररक्षक म्हणाला,'बस्स महाराज,ही गोष्ट कुणालाही सांगू नका की मी तुम्हांला बुडण्यापासून वाचवलं आहे!

-------

एके दिवशी एक शोध पत्रकार महान नेत्याच्या निवासस्थानी पोहोचून त्यांच्या चरणी वाकला,साहेब,माफ करावे.माझी लेकरंबाळं पोरकी होतील.मी त्या घटनेचे सगळे पुरावे नष्ट केले आहेत.हे घ्या ,या सार्‍या व्हिडिओ फिती आहेत.पुढच्या तारखेस मी माफी मागून खटलादेखील मागे घेईन!'

यावर शेजारीच उभे असलेले महान नेत्याचे सर्वात खास सल्लागार जे जुने कुप्रसिद्ध तडीपार गुंड होते,त्यांच्या कानात पुटपुटले,परंतू साहेब! आजपर्यंत तर सत्तावीस साक्षीदार रस्ते अपघातात,हृदयविकाराच्या धक्क्याने किंवा आत्महत्या करून मरून गेले आहेत.त्या पोलिस ठाण्यातसुद्धा सगळ्या फाईल्स आग लागल्याने जळून गेल्या आहेत.हे प्रकरण ज्या न्यायमुर्तींच्या कोर्टात होते,ते ही एका पार्टीत गेले होते आणि हार्ट अटॅकने मृत्यू पावले.

आता त्यांच्याजागी जे आले आहेत,ते न्यायाधीश होण्याआधी वकील होते आणि बेकायदेशीर दारूच्या भानगडीतून मीच त्यांना वाचवून न्यायाधीश केलं होतं!'

------

एके दिवशी त्या महान नेत्याला,ज्यांच्या असण्याने काहीही शक्य होत असते,संशय आला की त्याची आणि काही खास लोकांच्या गाठीभेटी आणि चर्चा वगैरे यांचे व्हिडिओ चित्रण काही आतल्या लोकांनीच रेकाॅर्ड केलं आहे.

लगोलग प्रकरणाची गुप्त चौकशी सुरू झाली.कसून चौकशी पार पडल्यानंतर महान नेत्याच्या संरक्षण सल्लागाराने हा संशय निराधार असल्याचे सांगितले.परंतू जे महापुरूष महान नेत्याचा उजवा हात होते,त्यांनी महान नेत्याला सूचना दिली की आतापर्यंत पाच लोकांनी या प्रकरणी आपला अपराध कबूल केला आहे.त्यातील तिघांनी आत्तापर्यंत आत्महत्या  केल्या आहेत आणि एकाला आज रात्री हृदयविकाराचा झटका येणार आहे आणि दुसर्‍याची कार अहमदाबाद-बडोदा हायवेवर उद्या सकाळी अपघातग्रस्त होणार आहे.

------------

मराठी अनुवाद

भरत यादव

Bharat Yadav 

*

मूळ हिंदी

जज साहब जब अपने चैम्बर में पहुँचे तो हँसते-हँसते बेहाल हो रहे थे और पेट पकड़ कर कुर्सी में लुढ़के जा रहे थे ।

अर्दली के पूछने पर बोले,"बाप रे, ऐसा चुटकुला मैंने पूरी ज़िन्दगी में कभी नहीं सुना था !"

अर्दली ने पूछा,"कौन सा चुटकुला हुजूर ?"

जज साहब बोले,"वो मैं नहीं सुना सकता । अभी उसीपर एक स्टैंडअप कॉमेडियन को पाँच साल क़ैद बामशक्कत की सज़ा सुनाकर आ रहा हूँ । अपने महान नेता का ऐसा मज़ाक भला कैसे उड़ाया जा सकता है !"

*

सुबह-सुबह एक विशाल डैम पर बनी झील के किनारे  टहलते हुए, महान नेता रेलिंग से झुककर खड़े हो गये और मछलियों को देखने लगे । इतने में संतुलन बिगड़ा और वह उलटकर झील में जा गिरे और डूबने लगे । साथ चल रहे बॉडीगार्ड ने फ़ौरन कूदकर उन्हें बचा लिया ।

ख़ुश होकर महान नेता ने कहा,"माँगो, क्या माँगते हो !"

बॉडीगार्ड बोला,"बस हुजूर, यह बात किसी को बताइयेगा मत कि मैंने आपको डूबने से बचाया है !"

*

एक दिन एक खोजी पत्रकार महान नेता के आवास पहुँचकर उनके चरणों में लोट गया,"साहब, माफ़ी दे दीजिए । मेरे बाल-बच्चे अनाथ हो जायेंगे । मैंने उस घटना के सारे सुबूत नष्ट कर दिये हैं । ये लीजिए, ये सारे वीडियो टेप हैं। अगली तारीख पर मैं माफ़ी माँगकर मुक़दमा भी वापस ले लूँगा !"

इसपर बाजू में खड़े महान नेता के सबसे ख़ास सलाहकार जो पुराने कुख्यात तड़ीपार गुण्डा थे, उनके कान में फुसफुसा कर बोले,"लेकिन साहब ! अबतक तो सत्ताइस गवाह सड़क दुर्घटना में, हार्ट अटैक से या आत्महत्या करके मर चुके हैं । उस थाने में भी सारी फाइलें आग लगने से जल चुकी हैं । यह मामला जिन जज साहब की अदालत में था, वे भी एक पार्टी में गये थे और दिल का दौरा पड़ने से मर गये । अब उनकी जगह जो आये हैं, वो जज बनने से पहले वकील थे और अवैध शराब के मामले में मैंने ही उन्हें बचाकर जज बनवाया था ।"

*

एक दिन उन महान नेता को, जिनके होने से कुछ भी मुमकिन होता है, शक़ हुआ कि उनकी और कुछ ख़ास लोगों की मुलाक़ात और बातचीत वगैरह की कई वीडियो रिकार्डिंग कुछ अंदर के लोगों ने ही कर ली है । फ़ौरन मामले की गुपचुप तहक़ीकात शुरू हो गयी ।

गहरी खोजबीन के बाद महान नेता के सुरक्षा सलाहकार ने इस संदेह को निराधार बताया । 

लेकिन जो महापुरुष महान नेता के दाहिना हाथ थे, उन्होंने महान नेता को सूचित किया कि अबतक पाँच लोग इस मामले में अपना गुनाह कबूल कर चुके हैं । उनमें से तीन अबतक आत्महत्या कर चुके हैं और एक को आज रात दिल का दौरा पड़ने वाला है और दूसरे की कार अमदाबाद-बड़ौदा हाइवे पर कल सुबह दुर्घटना-ग्रस्त होने वाली है ।

*

©कविता कृष्णपल्लवी

Kavita Krishnapallavi 

#अनुवादमाला


No comments:

Post a Comment